इतके आमदार, खासदार असूनही बेळगावात विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला याचे कारण शोधले पाहिजे. कोण सहकार्य केले नाही याची चौकशी झाली पाहिजे असे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या विधान परिषद निवडणुकीतील पराभवाबाबत प्रतिक्रिया देताना येडियुरप्पा म्हणाले, या संदर्भात काल माझी मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा झाली आहे. तेच याबाबतीत निर्णय घेतील. याबाबत सखोल चौकशी करून, वस्तुनिष्ठ माहिती गोळा करून कार्यवाही करतील. बेळगाव,म्हैसूरमध्ये भाजपचा विजय निश्चित होता. मात्र आम्ही पिछाडीवर राहिलो असे येडियुरप्पा म्हणाले.
अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर आणि विकासावर २ दिवस चर्चा करण्यात येईल असे सभापतींनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याला सहमती दर्शवली आहे असे येडियुरप्पा यांनी सांगितले.


Recent Comments