धर्मांतर कायदा अल्पसंख्यांक समाजाच्या रक्षणासाठी आहे. जर बहुसंख्यांक हिंदू समाजाचे अल्पसंख्यांक समुदायात धर्मांतर झाले तर काय परिस्थिती निर्माण होईल? याचा विचार करणे गरजेचे आहे, असे मत भाजप राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी सी टी रवी यांनी व्यक्त केले आहे.

बेळगाव सुवर्णसौधमध्ये धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात ते बोलत होते. धर्मांतर कायदा अल्पसंख्याकांच्या अस्तित्वासाठी उपयुक्त ठरेल. पण जेव्हा अल्पसंख्याक समाज आपल्याला टार्गेट करून धर्मांतराला बंदी आणू पाहतो तेव्हा साहजिकच यामागील हेतू लक्षात येत आहे. त्या-त्या धर्माच्या सण समारंभांना या धर्मांतर कायद्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही. स्वतंत्रपणे प्रत्येकजण आपल्या धर्माचे आचरण करू शकतो. परंतु आमिष दाखवून, चुकीच्या पद्धतीने धर्मांतर करणे हे चुकीचे असून घाबरून कुणीही धर्मांतर करण्याची आवश्यकता नाही, असे मत सी टी रवी यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, धर्मांतर करण्याचा ज्यांचा उद्देश आहे, यासाठी हा कायदा अडचणीचा ठरणार आहे. धर्मांतर हा एक प्रकारचा व्यवसायाचं बनला असून यामध्ये काँग्रेसपक्ष देखील सहभागी आहे. या मुद्द्यावरून व्होटबँक निर्माण करण्याचा काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे. धर्मांतराला विरोध करून व्होटबँक तयार करून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हि खेळी मतदारांनी वेळीच ओळखून मतदारांनी अशा पक्षाला कोणतीही संधी देऊ नये, असे विधान सी टी रवी यांनी केले.
२०२३ सालच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा सत्तेवर आणणे हे आमचे लक्ष्य असून यासाठी जनमत संपादन करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
धर्मांतर कायद्यामुळे अल्पसंख्यांकांना कोणतीही अडचण किंवा त्रास होणार नसून हा कायदा प्रत्येकासाठी अनुकूल असेल, अशा विश्वास सी टी रवी यांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments