Belagavi

यत्नाळ यांचा माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना टोला

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन परतले आहेत. ‘काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्याने राहूकेतू शांत होतात असे म्हणतातया शब्दांत विजापूरचे . बसनगौडा पाटीलयत्नाळ यांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना टोला लगावला.

बुधवारी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना आ. यत्नाळ म्हणाले, नवग्रहांची शांती करावी लागते. राहू-केतूचीही शांती करावी लागते. पुढे त्रास होऊ नये म्हणून काही ग्रहांना आधी भेटून शांत करावे लागते. म्हणून मुख्यमंत्री बोम्मई आधी येडियुरप्पाना भेटण्यास गेले आहेत. त्याचे काय एवढे टेन्शन घ्यायचे? असे उपरोधाने सांगितले.

पक्षाने सिंदगी मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. पक्षाच्या उमेदवाराला ३१ हजार मताधिक्याने निवडणून आणले आहे. विजापूर विधान परिषद निवडणुकीसाठी मला बोलावलेच नाही. मीही भाजपला विजयी करण्याचे आवाहन करून घरात बसून राहिलो. पक्षाचा उमेदवार कसाबसा दुसऱ्या स्थानावर निवडून आला. पाहिजे तेंव्हा वापर करायचा पाहिजे तेंव्हा टाकून द्यायचे या धोरणाने पक्षाची हानी होते. मला कुठल्याही प्रचाराला बोलावले नाही. येडियुरप्पानी कसली तरी यात्रा काढली. त्यालाही बोलावले नाही अशी नाराजी यत्नाळ यांनी व्यक्त केली.

राज्यात कुठे-कुठे असा प्रकार घडलाय त्यावर आत्मचिंतन व्हायला पाहिजे. पुढील निवडणुकीत भाजप सत्तेवर यावा यासाठी आत्मपरीक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण आमचे मताधिक्य कमी झाले आहे. यावर राज्याध्यक्षांनी सर्व नेत्यांना बोलावून चर्चा केली पाहिजे. ज्या नेत्यांना दूर सारले आहे, त्यांना विश्वासात घेतले नाही तर पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे असे सांगत यत्नाळ यांनी स्वपक्षीय नेत्यांना इशारा दिला. राज्यात पुन्हा नेतृत्व बदल होणार का या प्रश्नावर, झाला तरी आमच्यासारख्या अप्रामाणिक, भ्रष्टाचाऱ्यांना ते काय पद देतात? बदल झाला तर जातो तिकडे अशा विनोदी शैलीत यत्नाळ यांनी उत्तर दिले.

 

 

Tags: