Hukkeri

मराठा समाजाने दाखवून दिली ताकद ! मागण्यांसाठी सुवर्णसौधसमोर भव्य आंदोलन

Share

 कर्नाटकातील मराठा समाजाचा प्रवर्गात समावेश करावा यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा समाजातर्फे आज सुवर्णसौधसमोर भव्य निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. एक महिन्याच्या आत मागण्या मान्य केल्यास राज्यभरात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कर्नाटकात मराठा समाजाची लोकसंख्या मोठी आहे. हा समाज आर्थिक, शैसखनिक, सामाजिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे या समाजाचा २-ए प्रवर्गात समावेश करावा, मराठा समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, त्याला ५० ते २०० कोटी रुपये निधी मंजूर करावा, माजी मंत्री श्रीमंत पाटील याना पुन्हा राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे आज सुवर्णसौधसमोर भव्य आंदोलन करण्यात आले. कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ५ हजारहून अधिक मराठा समाजबांधवांनी या आंदोलनात भाग घेत सरकारला समाजाची ताकद दाखवून दिली. यावेळी निदर्शम मराठा समाज बांधवानी भव्य निषेध मोर्चा काढून सुवर्णसौधला घेराव घातला.

सुवर्णसौधसमोर निदर्शकांना संबोधून बोलताना कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष शामसुंदर गायकवाड म्हणाले, येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील मराठा समाजाच्या विकासासाठी मराठा समाज विकास महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच श्रीमंत पाटील याना मंत्रिपद देण्याचे सांगितले होते. मात्र अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यानंतर बोम्मई मुख्यमंत्री झाल्यानंतर २ हजार मराठा समाज बांधवांच्या सहभागाने त्यांची भेट घेऊन आमच्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यांनी एक महिन्याच्या आत तुमच्या मागण्या मान्य करू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील ५ हजारहून अधिक मराठा समाज बांधवांच्या सहभागाने आज सुवर्णसौधसमोर आंदोलन करीत आहोत. येत्या १० जानेवारीच्या आत आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यभरात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गायकवाड यांनी दिला.

यावेळी बेळगावसह राज्याच्या विविध भागांतून आलेले मराठा समाज बांधव निदर्शनात सहभागी झाले होते.

 

Tags: