मनीपॉवर, पॉवर सेंटरमुळे विधान परिषद निवडणुकीत जेडीएसचा पराभव झाल्याचे आ. बंडेप्पा काशेमपूर यांनी सांगितले.

बेळगावातील सुवर्णसौधमध्ये बुधवारी पत्रकारांशी बोलताना जेडीएस आ. बंडेप्पा काशेमपूर म्हणाले, आम्ही विधान परिषदेच्या ६ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी किमान ५ जिंकू असा विश्वास होता. मात्र २ जागा जिंकू शकलो. मनीपॉवर, पॉवर सेंटरमुळे आमचा पराभव झाला. पण या निवडणुकीपेक्षा आम्हाला २०२३ची विधानसभा निवडणूक महत्वाची आहे असे कुमारस्वामी यांनी आधीच सांगितले होते. आम्ही मिशन १२३ला अधिक महत्व दिले आहे. मंड्या, तुमकूर येथे आम्हाला जास्त अपेक्षा होती. वरिष्ठ सभागृह हे मोठे व्यासपीठ आहे. मात्र आता पैशाच्या बळावरच त्या सभागृहात जावे लागते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमचा पराभव झाला. पुढील काळात लोककल्याणाची कामे करून लोकांसमोर जाऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments