हुक्केरी तालुक्यातील राजकट्टी या गावातील ओसाट या संस्थेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या शाळा खोल्यांचे शिक्षण मंत्री बी सी नागेश यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी परिसरातील राजकट्टी या गावातील सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ओसाट या संस्थेच्या वतीने सुमारे पन्नास लाख रुपयांच्या खर्चातून शाळा खोल्यांचे आणि हायटेक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. याचा उद्धघाटन समारंभ शिक्षण मंत्री बी सी नागेश यांच्याहस्ते नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर संस्थेचे मुख्यस्थ एम के सत्यप्रसाद आणि जयंती गिरीमाजीं यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी जिल्हापंचायत सदस्य मंजुनाथ पाटील, डीडीपीआय ए जी गंगाधर, बीईओ मोहन दंडीन आदी उपस्थित होते.
यानंतर क्षीरभाग्य या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दूध वितरण करण्यात आले. यावेळी मंत्री बी सी नागेश यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण केले. गावातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी बंगळूरच्या ओसाट या संस्थेने घेतलेला पुढाकार आणि निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. हुक्केरी तालुक्यातील राजकट्टी गावात पन्नास लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या आणि हायटेक शौचालयाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हा आणि तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या शिक्षकांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन सादर केले. यावेळी अक्षर दासोहाचे सहायक संचालक श्रीशैल हिरेमठ, मुख्याध्यापक संतोष इंडी, सरकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष महांतेश नाईक, क्षेत्र संसाधन अधिकारी डी. एस. नाईक आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments