Vijayapura

विजापुरात काँग्रेस-भाजपला समसमान यश

Share

 विजापूरबागलकोट मतदार संघातील विधान परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला समसमान यश मिळाले आहे. या पक्षांचे अनुक्रमे सुनीलगौडा पाटील आणि पी. एच. पुजारी निवडून आले आहेत.

विजापुरातील दरबार शाळेत मतमोजणी करण्यात आली. त्यात काँग्रेसचे सुनीलगौडा पाटील यांनी ३२४५ मतांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या पी. एच. पुजारी यांना २२१९ मते मिळाली. अपक्ष उमेदवार मल्लिकार्जुन लोनी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना १४६६ मतांवर समाधान मानावे लागले. निकाल जाहीर होताच सुनीलगौडा यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला. फटाके फोडून, गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.

 

Tags: