विधान परिषद निवडणुकीत राज्यभरात भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, कोडगीमध्ये भाजप उमेदवार सृजा कुशलप्पा यांचा विजय झाला आहे. कमीतकमी १५ जागांवर भाजप बहुमत मिळवेल असा विश्वास ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी व्यक्त केलाय.

व्हॉइस : बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही निवडणुकीचा संबंध आगामी निवडणुकीशी नसेल. २५ मतदार संघात झालेल्या निवडणुका या लांच्छनास्पद झाल्या असून या निवडणुकीत पैसे वाटपासारख्या गोष्टी घडल्याचा त्यांनी निषेध केला. परिषद हवी कि नको याबाबत वरच्या सभागृहात आता चर्चा करणे गरजेचे असल्याचे मत ईश्वरप्पा यांनी व्यक्त केले.
यानंतर बोलताना ते म्हणाले, विधान परिषद रद्द करणे योग्य ठरणार नाही. यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे. परिषद हवी कि नको यावर राजकीय चर्चा होणे गरजेचे असून अशापद्धतीच्या निवडणूक मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पहात असल्याची प्रतिक्रिया ईश्वरप्पानी व्यक्त केली.
यावेळी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या बंदबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीवर मंत्री ईश्वरप्पा यांनी तोंडसुख घेतले असून समिती जिवंत आहे हे दाखविण्यासाठी हा खटाटोप करत असल्याचे विधान ईश्वरप्पा यांनी केले आहे.


Recent Comments