विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी विधानसभेत मंगळवारी अतिवृष्टीची भरपाई न दिल्याच्या मुद्यावरून सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, रायबाग, रामदुर्ग आदी तालुक्यात अतिवृष्टीने घरे कोसळल्याची भरपाई मागत महिला लेकरा–बाळांसह वणवण फिरत आहेत. मात्र २०१९मध्ये पडलेल्या घरांची भरपाई सरकार अजूनही द्यायला तयार नाही. ५ लाख रुपये भरपाई देतो म्हणून सांगून अजून ५ पैसेही का दिले नाहीत असा खडा सवाल त्यांनी सरकारला केला.



Recent Comments