बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी कसलीही तडजोड झालेली नाही. या घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीवरून आम्ही मागे हटणार नाही असा इशारा काँग्रेस आ. प्रियांक खर्गे यांनी सरकारला दिला.
बेळगावात सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना, सरकार बिटकॉइन घोटाळ्यातील सत्य लपवत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. आम्ही पहिल्या दिवसापासूनच चैकशीची मागणी लावून धरली आहे. या सरकारच्या पर्सेंटेज भ्रष्टाचाराबाबत कंत्राटदार संघटनेने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. अधिकृतपणे मोदींना पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचाराचा याहून अधिक पुरावा काय हवा? असा प्रश्न त्यांनी केला.
एकंदर ४० पर्सेंट सरकार, बिटकॉइन घोटाळ्यावरून राज्य सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील असा इशारा काँग्रेस आ. प्रियांक खर्गे यांनी सरकारला दिला.


Recent Comments