खानापूर तालुक्यातील अवरोळी गावचे पत्रकार डी. व्ही. कम्मार यांचा गावातील रुद्रस्वामी मठातर्फे श्री चन्नबसव देवरु स्वामीजींच्याहस्ते सत्कार करून गौरविण्यात आले.

पत्रकार डी. व्ही. कम्मार यांना नुकताच अक्षरमाता लुई सालढाना सेवा संस्थेतर्फे श्रमिकरत्न पुरस्कार आणि नवीलुगेरी साहित्य आणि सांस्कृतिक वेदिकेतर्फे कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांच्या स्वतःच्या गावातील रुद्रस्वामी मठातर्फे श्री चन्नबसव देवरु स्वामीजींच्याहस्ते सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. यावेळी पत्रकार विवेक कुरगुंद व अन्य उपस्थित होते.


Recent Comments