नोटरी वकिलांच्या कामाच्या हक्कावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात हुक्केरीत नोटरी वकिलांनी कामावर बहिष्कार टाकून आंदोलन केले.

या संदर्भात माहिती देताना ऍड. टी. एस. सोड्डण्णावर म्हणाले, केंद्र सरकारने १५ वर्षे नोटरी काम केलेल्या वकिलांना त्यापुढे काम करण्यास बंदी घालणारा नियम आणला आहे. त्यामुळे नोटरींना सक्तीची निवृत्ती घेणे भाग पडणार आहे. नोटरींना सरकार कसलीही पेन्शन देत नाही. उलट नोटरीच सरकारला कर भरतात. या नियमामुळे नोटरी वकिलांची कुटुंबे रस्त्यावर येतील. त्यामुळे तातडीने हा नियम रद्द केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
त्यानंतर नोटरी एम. एम. पाटील म्हणाले, १५ वर्षानंतर नोटरींना सक्तीची निवृत्ती घेण्यास भाग पाडणाऱ्या कायद्याच्या निषेधार्थ केंद्र, राज्य व जिल्हा नोटरी संघटनेच्या सूचनेनुसार आज नोटरी वकिलांनी कामावर बहिष्कार टाकून आंदोलन पुकारले आहे यावेळी नोटरी एस. एस. नागनुरी, बी. ए. शिंदीहट्टी, एम. एस. हुल्लोळी, व्ही. जे. थोरवत आदी उपस्थित होते.


Recent Comments