Belagavi

मी मुख्यमंत्री झालो तर राज्याचा इतिहासच बदलेल ! यत्नाळांची फटकेबाजी

Share

मी मुख्यमंत्री झालो तर राज्याचा इतिहासच बदलेल अशा शब्दांत विजापूरचे . भाजपचे फायरब्रॅन्ड  बसवराज पाटीलयत्नाळ यांनी जोरदार फटकेबाजी केली.

बेळगावात सुवर्णसौध आवारात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आ. बसवराज पाटील-यत्नाळ यांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनाही त्यांचे नाव न घेता चिमटे काढले. पक्षाने वंश-परंपरागत राजकारणाला थारा देऊ नये ही माझी प्रमुख मागणी आहे. पक्षाचे हायकमांडही टप्प्या-टप्प्याने पक्षातील घराणेशाही दूर करत आहेत. घराणेशाही सुरु ठेवणाऱ्यांना दूरच सारले पाहिजे ही माझी मागणी आहे. मात्र याबाबत मी हायकमांडकडे तक्रार करणार नाही. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच माझी भूमिका मांडणार आहे असे यत्नाळ यांनी स्पष्ट केले. त्यावर तुम्ही मुख्यमंत्री झाला तर मंत्रिमंडळ बदलणार का? या प्रश्नावर, मी मुख्यमंत्री झालो तर राज्याचा इतिहासच बदलेल असे उत्तर त्यांनी दिले.

भ्रष्टाचाराबाबत प्रतिक्रिया देताना आ. यत्नाळ म्हणाले, भ्रष्टाचाराचे जनक आता दूर झाले आहेत. भ्रष्टाचाराचा टक्काही घसरला आहे. तथाकथित सुपर सीएम असताना भ्रष्टाचार बोकाळला होता. तो आता टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. एकदम कमी होणार नाही.

एकंदर भ्रष्टाचाराबाबत यत्नाळ यांनी केलेल्या या विधानाचे चटके काहींना बसणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढे काय होते हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.

 

 

 

Tags: