राज्यात आणि देशात काँग्रेसला राजकीय भवितव्य नाही अशी टीका परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू यांनी केली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री श्रीरामुलू म्हणाले, आमच्या सरकारने केलेली लोकल्याणाची कामे आणि पंतप्रधान मोदींनी केलेला देशाचा विकास पाहून विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी आम्हाला बहुमत दिले आहे. हाच जनाधार २०२३च्या विधानसभा निवडणुकीतही आम्हाला लाभेल. काँग्रेसला नाकारून लोक भाजपलाच जवळ करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील परिवहन कर्मचाऱ्यांचे दीड महिन्याचे वेतन बाकी आहे. ते देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. आधीच्या तुलनेत परिवहन मंत्रिपद स्वीकारल्यापासून मी अनेक सुधारणा केल्या आहेत. अर्थ खात्याशी चर्चा करून दीड महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असेही श्रीरामुलू यांनी सांगितले. एकंदर विधान परिषद निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही लोक भाजपलाच सत्तेवर आणतील असा विश्वास परिवहन मंत्री श्रीरामुलू यांनी यावेळी व्यक्त केला.


Recent Comments