धर्मांतरामुळे देशाच्या एकसंघतेला धोका पोहोचतो. तो टाळण्यासाठी धर्मांतराच्या विरोधात कडक कायदा आणण्याची गरज आहे असे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले.

बेळगाव अधिवेशनात भाग घेण्यासाठी सोमवारी सकाळी सुवर्णसौध येथे आले असता, पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री अशोक म्हणाले, आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार करणे आणि नंतर लग्न करतो म्हणून सांगून धर्मांतर करण्याची जबरदस्ती करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पीडितेला धर्मांतर करणे अपरिहार्य ठरते. धर्माच्या आधारावर पाकिस्तान, बांगला देशाची निर्मिती झाली आहे. आता भारताचे आणखी तुकडे पडायला नकोत. त्यासाठी धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा आणणे गरजेचे आहे. तरच देश एकसंघ राहील. भाजप हा देश एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करतोय. सरकारही तोच मार्ग अवलंबतेय असे मंत्री अशोक यांनी सांगितले.


Recent Comments