Belagavi

१५ जागा जिंकून परिषदेत बहुमत मिळवू : येडियुरप्पा

Share

उद्या जाहीर होणाऱ्या निकालात भाजप विधान परिषदेच्या किमान १५ जागा जिंकून परिषदेत बहुमत मिळवेल असा दावा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.

सोमवारी हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, निवडणूक निकालानंतर भाजप विधान परिषदेत १५ जागा जिंकून नक्की बहुमत मिळवेल. बेळगाव अधिवेशनात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत. धर्मांतर विरोधी कायदाही मंजूर होण्याची शक्यता आहे. या कायद्याला काँग्रेस विरोध करेलच, परंतु आम्ही तो मंजूर करण्याच्या बाजूने आहोत. अनेक राज्यांत धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात आला आहे.

कर्नाटकातही अधिवेशन संपायच्या २-३ दिवस आधी तो लागू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबाबत केवळ माझा नव्हे तर सर्व आमदार, खासदारांचे मत विचारात घेण्यात आले आहे असे ते म्हणाले.  मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याना भाजप नेत्यांकडून सहकार्य मिळत नाही या बसवराज रायरेड्डी यांच्या आरोपात काही तथ्य नाही, त्यांना सर्वजण सहकार्य करत आहेत. आपला अवधी ते पूर्ण करतील असे येडियुरप्पा म्हणाले.

 

Tags: