महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यामुळे पोटशूळ उठलेल्या गुंड प्रवृत्तीच्या कानडी कार्यकर्त्यांनी समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यावर काळी शाई ओतल्याची घटना व्हॅक्सिन डेपो येथे घडली. या घटनेने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानात महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या गुंड कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन पोलिसांच्या समक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर काळी शाई फेकली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. समिती कार्यकर्ते यामुळे संतप्त झाले.
https://fb.watch/9SEnk1ZW2Z/
माजी आ. मनोहर किणेकर यांनी या घटनेचा निषेध केला. लोकशाही मार्गाने आम्ही अन्यायाच्या विरोधात लढा देत असताना कन्नड कार्यकर्त्यांनी हे भ्याड कृत्य केले आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहोत. या कृत्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. महामेळावा संपल्यावर याबाबत टिळकवाडी पोलिसात तक्रार देणार आहोत असे किणेकर म्हणाले.


Recent Comments