Belagavi

विकास साधून जिंकण्याची शक्ती भाजपात नाही : सतीश जारकीहोळी यांचा टोला भाजपाकडे दूरदृष्टीकोन नसल्याची टीका

Share

धर्मांतर निषेध कायदा नव्याने कशापद्धतीने मांडणार हे आपल्याला माहीत नाही. जरी हे विधेयक मांडण्यात आले तरी ते मंजूर होणार नाही. भाजपाकडे विकासामुळे जिंकण्याची ताकदही नाही आणि दूरदृष्टिकोनही नाही. त्यामुळे भाजप जाती आणि धर्माच्या नावावर चालतो, असा टोला केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी लगावला आहे.

व्हॉइस : खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष पदयात्रेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सतीश जारकीहोळी यांनी भाजपवर निशाणा साधला. धर्मांतर विरोधी कायदा आधीच संविधानात नमूद आहे. आता नव्याने भाजप कसा तो सादर करेल, याचीच उत्सुकता आहे. सीई, एनआरसी जुन्या कायद्यांपैकीच आहे. विनाकारण हे कायदे नव्याने आणून जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काम भाजप करत असून जनतेने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे मतदेखील जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने जाहीर केलेले तीन कृषी सुधारणा कायदे मागे घेतल्यानंतर, राज्यांनी ते स्वत:हून काढून टाकावेत. केंद्र सरकारने मागे घेतल्यानंतर सदर कायदे राज्यात लागू करण्याचा अधिकार नाही. याबाबत सभागृहात प्रश्न विचारण्यात येणार असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

संविधानात आधीच नमूद असलेले कायदे भाजप सरकार नव्याने अधिवेशनादरम्यान सादर करणार असून या कायद्याची सध्या कोणतीही आवश्यकता नसल्याचे मत सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे. शिवाय यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप जाती आणि धर्मावर आधारित राजकारण करते असा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

Tags: