सुवर्णसौधमध्ये सुरु झालेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची पाहणी मी केली आहे. कोरोना प्रतिबंधक लशीचे २ डोस घेतलेल्यानाच प्रवेश देण्याची सूचना संबंधितांना केली आहे असे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी सांगितले.

बेळगाव अधिवेशनात भाग घेण्यासाठी सोमवारी सकाळी सुवर्णसौध येथे आले असता, पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, अधिवेशन काळात खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात येतील. सुवर्णसौधच्या चारही प्रवेशद्वारावर डॉक्टर्स, आरोग्य खात्याचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. २ डोस घेतलेल्यानाच आत प्रवेश देण्यात येत आहे.
राज्यात सापडलेल्या ओमीक्रॉनच्या ३ रुग्णांच्या प्राथमिक व द्वितीय संपर्कात आलेल्यांची चाचणी करून नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवून देण्यात आले आहेत. त्याच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत. रुग्णांना सरकारी इस्पितळातच विलगीकरणात ठेवले आहे. कोणामध्येही कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आलेली नाहीत. परदेशातून आलेल्यांवर निगराणी ठेवण्यात येत आहे. विमानतळावरच चाचण्या करून खातरजमा करण्यात येत आहे असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


Recent Comments