Belagavi

राजकीय द्वेषातून धर्मांतर विधेयक सादर : सिध्दरामय्यांचा आरोप

Share

सध्या धर्मांतर कायद्याचा मुद्दा महत्वाचा नाही. परंतु भाजप सरकार राजकीय द्वेषातून हे विधेयक मांडत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला आहे.

: बेळगावमध्ये आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी भाजपवर त्यांनी निशाणा साधला असून भाजप प्रचारासाठी हे सर्व करत असल्याचे ते म्हणाले. केवळ एकाच समाजाशी निगडित असलेला हे विधेयक मांडण्यात येत असून विनाकारण गोंधळ निर्माण करण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोप करत धर्मांतर निषेध कायद्याला विरोध करण्याचा निर्धार केला असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.

याबरोबरच संविधानातील उद्दिष्टे आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून कोणत्याही जाती धर्मात भेदभाव न करता सर्व जाती, धर्म आणि केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून मार्गक्रमण करून मानवतावादी मूल्यांना महत्त्व देतो. असे सिद्धरामय्या म्हणाले. आमचा सामाजिक न्यायावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Tags: