विजापूर पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी २ ठिकाणी छापेमारी करून सरकारी योजनेतील सुमारे १६ लाखांचा तांदूळ जप्त केला.
अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने २ वेगवेगळ्या ठिकाणी काळ रात्री उशिरा छापे टाकले. विजापुरातील कन्नन नगरातील एका शेडवर छापा टाकण्यात आला. यावेळी सरकारी योजनेतील कँटरमधून नेण्यात येत असलेला ५७८ क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. त्याचे बाजारमूल्य १५ लाख ६७ हजार रुपये आहे. हा साठा जप्त करून अधिक तपास करण्यात येत आहे.


Recent Comments