कोविड च्या तिसऱ्या लाटेची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु असून काही ठिकाणी याचा परिणाम देखील दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर विजापूर जिल्ह्यात कोविडच्या संभाव्य धोक्याला सामोरे जाऊन योग्य बंदोबस्तासाठी विजापूर जिल्हा सज्ज झाला असून यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवेची सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.

व्हॉइस : सध्या कोविडच्या तिसऱ्या लाटेचे वारे वाहू लागले असून याचे परिणाम बहुतांशी प्रमाणात महाराष्ट्र राज्यात दिसून येत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या आणि याच अनुषंगाने सीमेवरील विजापूर जिल्ह्यात याची अधिकाधिक शक्यता असल्याने विजापूर जिल्ह्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी करण्यात आली आहे. कोविड रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन बेड्स, संबंधित वैद्यकीय व्यवस्था या साऱ्याची सोय जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.
बहुतांशी नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याने तिसऱ्या लाटेमध्ये जीवितहानी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत कोविडमुळे जीवितहानी होऊ नये साठी विजापूर जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय सेवा पुरविण्याची सर्व व्यवस्था केली आहे. कोविड च्या नव्या विषाणूचा प्रसार देखील वाढत चालला आहे. या सर्व दृष्टिकोनातून एकूण ३५० बेड्सपैकी २१५ बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या लाटेत लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असून लहान मुलांसाठी ५० बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. शिवाय १० आयसीयू विभागातील बेड्स, आणि इतर १५ बेड्स देखील राखीव ठेवण्यात आले आहेत. वयस्करांसाठी १६० बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शस्त्रचिकित्सक डॉ. लक्कण्णावर यांनी दिली. 
यासह जिल्ह्यात दोन नवे ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण करण्यात आले आहेत. १००० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन जनरेट करणाऱ्या प्लांटचा प्रारंभ करण्यात आला असून येत्या आठवड्यात ९६० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन जनरेटर प्लांटची सुरुवात करण्यात येत आहे. शिवाय १६० जम्बो सिलिंडर, २५० नॉर्मन सिलिंडर देखील तयार असून ४६ ऑक्सिजन काँसंट्रेटर्सची देखील सोय करण्यात आली आहे. श्वासोच्छवासाचा त्रास जाणवल्याने ८ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांचा त्रास कमी झाल्याने त्यांना कोविड निगेटिव्ह म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सीमावर्ती भागात ११ चेकपोस्ट देखील स्थापन करण्यात आले असून या चेकपोस्टवर कटाक्षाने सर्व तपासणी करण्यात येत आहे. यासंदर्भात आमच्या इन न्यूजच्या प्रतिनिधीला शस्त्रचिकित्सक डॉ. लक्कण्णावर आणि जिल्हा पोलीस प्रमुख एच डी आनंदकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (बाईट)
पुन्हा कोरोनाच्या नव्या विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याची माहिती समोर आली असून कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यासाठी विजापूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे.


Recent Comments