खानापूरच्या विकासाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर वासियांनी आज सुवर्णसौधकडे संघर्ष यात्रेचे आयोजन केले होते. खानापूरहून बेळगाव सुवर्णविधानसौधपर्यंतचा सुमारे ४० किलोमीटर पर्यंतच्या प्रवास पदयात्रेच्या माध्यमातून आयोजित केला असून या पदयात्रेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही सहभाग घेतला.

खानापूरच्या विकासासाठी आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही साथ दिली. बेळगावमध्ये आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा काढण्यात आली असून या पदयात्रेच्या माध्यमातून खानापूरच्या विकासाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा मानस आहे. यासाठी सुमारे ४० किलोमीटर पल्ल्याची पदयात्रा आज आयोजित करण्यात आली होती.
https://fb.watch/9SwDQbYKyz/
खानापूरपासून सुरु झालेली पदयात्रा बेळगावमध्ये पोहोचल्यानंतर आमदार अंजलीताई निंबाळकर यांना साथ देण्यासाठी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी, सिद्धरामय्या यांचे पुत्र आमदार यतींद्र हेदेखील या पदयात्रेत सहभागी झाले.
हजारो लोकांसह ही पदयात्रा सुवर्णसौधकडे आगेकूच करत आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले जाईल का? आणि ही पदयात्रा खानापूरच्या विकासाला कितपत पूरक ठरेल, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.


Recent Comments