Belagavi

सीडीएस रावत व इतरांना सांबरा येथे आदरांजली

Share

रक्षक माजी सैनिक संघ, सांबरा यांच्यावतीने हेलिकॉप्टर दुर्घटनेत बळी पडलेले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांना मेणबत्त्या पेटवून आदरांजली वाहण्यात आली.

व्हॉईस ओव्हर : होय, ८ डिसेंबर २०२१ हा भारतीय लष्कराच्या इतिहासातील काळा दिवस म्हणावा लागेल. याच दिवशी तमिळनाडूतील कुन्नुरहून वेलिंग्टनला जाताना सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन रावत यांच्यासह १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांना सांबरा येथील माजी सैनिक संघाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी मेणबत्त्या पेटवून, मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. संघाचे अध्यक्ष लक्ष्मण खवसपूर यांनी जनरल रावत यांच्या देशासाठीच्या योगदानाची माहिती दिली.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष जोतिबा चव्हाण, संचालक लक्ष्मण जैसावर, यल्लाप्पा मोढेकर, अरुण जाधव, भुजगौडा पाटील, यल्लाप्पा पाटील, कल्लाप्पा बकरे, मुत्तेण्णा कातराळ, सचिव प्रदीप तिम्माण्णाचे, नितीन चिंगळी, सदस्य एस. एस. उल्लागड्डी, लक्ष्मण सुळेभावी, सतबन्नावर तसेच लहान मुलांनी आदरांजली वाहिली.

 

Tags: