राष्ट्रीय बसवदल, बेळगाव यांच्यावतीने ३५ वा शरणमेळावा प्रचार आणि बसव करुणा अनाथालयाचे उद्घाटन पार पडले.

बेळगाव राष्ट्रीय बसवदल यांच्यावतीने ३५ व्या शरणमेळा प्रचाराचे आणि बसव करुणा अनाथालयाचे उदघाटन करण्यात आले. शुक्रवारी महांतेश नगर येथील विश्वगुरू बसव मंडपात झालेल्या कार्यक्रमात श्री महाजगद्गुरू डॉ. गंगादेवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरू श्री बसव प्रकाश स्वामीजी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण आणि बसवण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून, दीपप्रज्वलनाने झाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार अनिल बेनके यांनी बेळगावमध्ये झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला. बेळगावमधील सर्व ग्लास हाऊसचे रूपांतर अनुभवमंटपात करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव शहरात सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चातून उत्तम अनुभव मंडपाची निर्मिती करण्यात येईल असे ते म्हणाले. तसेच डिजिटल लायब्ररीची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती बेनके यांनी दिली. 
यावेळी कन्नड साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीमती मंगला मेटगुड, ज्येष्ठ मान्यवर आणि राष्ट्रीय बसव दलाचे सर्व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments