आपल्या देशातील सर्वात प्राचीन आणि पौराणिक शहर तसेच गंगेच्या काठावर असलेल्या भगवान विश्वनाथांचे निवासस्थान असलेल्या काशी शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारने एक विशेष योजना आखली आहे. १३ डिसेम्बर रोजी ‘भव्य काशी, दिव्य काशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील नागरिकांना पाहता यावा, यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप नेते संजय पाटील कनमडी यांनी दिली आहे.

विजापूर शहरात पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भव्य काशी, दिव्य काशी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून देशभरात सर्वांना हा कार्यक्रम पाहता यावा, यासाठी विजापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या माध्यमातून एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. १३ डिसेंबर रोजी विजापूरमधील नरसिंह देवस्थानात एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली असून ‘भव्य काशी, दिव्य काशी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील १२ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महत्वाचा समारंभ आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. या सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी, भाजप जिल्ह्याध्यक्ष आर. एस. पाटील कुचबाळ, बेळगाव विभाग संघटना कार्यदर्शी प्रकाश अक्कलकोट, जिल्हा पदाधिकारी डॉ. सुरेश बिरादार, शिवरुद्र बागलकोट आदींसह इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments