कागवाड तालुक्यातील ऐनापूर परिसरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरी करताना रंगेहाथ पकडून सदर चोराला जनतेने पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे.

कागवाड तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत चालली आहे. शनिवारी आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या बॅगमधून मोबाईल चोरी करताना आढळलेल्या युवकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करताना व्यस्त असणाऱ्या संजय मुधवी नामक व्यक्तीचा मोबाईल चोरट्याने खिशातून काढताना पाहिला. दरम्यान यामध्ये दोघांचा समावेश होता. आरडाओरडा सुरु केल्यानंतर त्यापैकी एकाने पोबारा केला आणि एक चोर मात्र नागरिकांच्या तावडीत सापडला. घडलेल्या या एकंदर प्रकाराबाबत संजय मुधवी, बाळू गाडीवड्डर आणि सविता पाटील यांनी दिलेली माहिती पाहुयात…
पोलीस हेल्पलाईन ११२ या क्रमांकावर ऐनापूर येथील महिला सविता पाटील, कात्राळ ग्रामपंचायत सदस्य संजय मुधवी, बाळू गाडीवड्डर, रावसाहेब कांबळे, संतोष माळी, बाळासाहेब दानोळ्ळी, सिद्दप्पा खटावी, अनिल पारशेट्टी, चिन्नाप्पा शिरहट्टी आदींनी रंगेहाथ पकडलेल्या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर चोरी करणाऱ्या युवकांसोबत आणखी एक युवक देखील होता.. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना या चोरबाबत माहिती विचारण्यास सांगितले. परंतु पोलिसांनी या नागरिकांना पोलीस स्थानकात येण्याचे आवाहन केले. पोलीस स्थानकात आल्यानंतर सर्व माहिती देण्यात येईल, असे पोलिसांनी सूचित केले.
कागवाड पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील ऐनापूर, मोळे, मंगसुळी, केम्पवाड, मुदभावी यासह अनेक गावात चोरीचे प्रकार वाढत आहेत. अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत असून या चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.


Recent Comments