Belagavi

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे निदर्शने

Share

कर्नाटकातील मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे येत्या बुधवारी (ता. १५) अधिवेशन काळात सुवर्णसौधसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे राज्याध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांनी शनिवारी बेळगावात पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, राज्यातील मराठा समाजाचा ३-ए प्रवर्गातून २-ए प्रवर्गात समावेश करावा ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याशिवाय मराठा समाजाच्या विकासासाठी महामंडळ स्थापन करावे आदी मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी येत्या १५ डिसेंबरला कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे सुवर्णसौधसमोर भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यभरातील मराठा समाज बांधवाना ‘चलो बेळगाव’ची हाक देण्यात आली आहे असे गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे सरचिटणीस जी. डी. घोरपडे, उपाध्यक्षा सुमित्रा, सचिव वाघमोडे आदी उपस्थित होते.

 

Tags: