Kagawad

ऍग्रिगोल्ड कंपनीच्या नावावर आर्थिक फसवणूक : कंपनी बंद झाल्याने एजंटवर जीव देण्याची वेळ

Share

अग्रिगोल्ड या कँपींच्या नावावर एजंट नेमून अनेक नागरिकांकडून पैसे घेण्यात आले होते. रोजगार देण्याचे सांगून उचलण्यात आलेले पैसे आणि सदर कंपनी आता संपूर्णपणे बंद झाली असून या व्यवहारात मध्यस्थी केलेल्या एजंटवर आता जीव देण्याची वेळ आली आहे.

आंध्रप्रदेश येथील अग्रिगोल्ड नामक खासगी कंपनीने नागरिकांना लाखो रुपयांना गंडवले आहे. नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांकडून एजंटच्या माध्यमातून पैसे उकलण्यात आले आहेत. सध्या हि कंपनी पूर्णपणे बंद झाली असून एजंट मात्र अडचणीत आले आहेत. जवळपास ८ राज्यांमध्ये ३२ लाख खाती, ६३८५ कोटी रुपयांचे चलन या कंपनीच्या हिशोबात असून यासंदर्भात सीआयडी तपासदेखील करण्यात आला आहे. काही मालमत्ता देखोल जप्त करण्यात आल्या असून या मालमत्तांची विक्री करून आता नागरिकांचे पैसे परत देण्याची मागणी करण्यात येत आहेत.

भविष्यात कोणता तरी फायदा होईल, या भावनेने ग्राहकांनी या कंपनीत पैसे दिले होते. परंतु अचानक बंद झालेल्या या कंपनीने ग्राहकांनाच शॉक दिला आहे. घरात मुलाचे लग्न जवळ आले आहे परंतु आपल्या हातात एक पैसाही नसल्याचे या कंपनीच्या एजंट शालिनी यादवाड यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून सदर प्रकरणाचा छडा लावावा, आपल्या आयुष्याच्या कमाईचे पैसे आपल्याला परत मिळावेत, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

सदर कंपनीची मालमत्ता जप्त करून ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सरकराने प्रयत्न करावेत, असा आग्रह ग्राहक आणि एजंटांनी केला असून या प्रकरणाची दखल न घेतल्यास बेळगाव मध्ये होणाऱ्या अधिवेशनात आंदोलन करण्याचा इशारा ग्राहक आणि एजंटांनी दिला आहे.

Tags: