Belagavi

सिद्धार्थ मेडिकेअर फार्मसीतर्फे महिलांसाठी आरोग्य जागृती अभियान

Share

 महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जागृती निर्माण करण्यासाठी सिद्धार्थ मेडिकेअर फार्मसीतर्फे अभियान राबविण्यात येत असल्याचे डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले.

शनिवारी बेळगावात पत्रकार परिषद घेऊन बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी महिला हेल्थ किटचे अनावरण करून त्याची माहिती दिली.

यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या, महिलांना मासिक पाळीच्या त्रासामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांनी त्याबाबत स्वच्छता राखणे गरजेचे आहे. याबाबत जागृती करण्यासाठी सिद्धार्थ मेडिकेअर फार्मसीतर्फे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात महिलांना मोफत हेल्थ कीट्सचे वाटप करण्यात येईल. त्याचा महिलांनी सदुपयोग करून घ्यावा. यावेळी डॉ. रिंकू पोरवाल, कबीर पाटील, भूमिका, मोनिका असुंडी आदी उपस्थित होते.

 

Tags: