पतीच्या पहिल्या पत्नीच्या मुलांना मारण्यासाठी पतीला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून मींचनाळ तांडा येथील सावत्र आईला विजापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

सविता विनोद चव्हाण, रा. मींचनाळ तांडा, विजापूर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पतीच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या सुमित आणि संपत या दोन कोवळ्या मुलांचा आपल्या संसारात अडथळा होत असल्यावरून त्या दोघांना मारण्यासाठी पती विनोदला चिथावणी दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. तिच्या चिथावणीमुळे विनोद चव्हाण याने सुमित व संपतचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुमितचा मृत्यू झाला होता तर संपत गंभीर जखमी झाला आहे. विजापूर ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments