कोरोनाचा नवा व्हायरस ओमिक्रॉनची दहशत महाराष्ट्र–कर्नाटकात पसरली असतानाच विजापूर जिल्ह्यात महाराष्ट्र सीमेजवळ कोरोना मार्गसूचीचे उघड उल्लंघन करत श्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा साजरी करण्यात येत आहे.

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील बरडोल ग्रामस्थानी श्री मल्लिकार्जुन देवाची भव्य यात्रा आयोजित केली आहे. महाराष्ट्र सीमेपासून हे गाव केवळ ८ किमीवर असून यात्रेला महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विधान परिषद निवडणूक आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजापूर जिल्हा प्रशासनाने यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यावर निर्बंध घातले होते. 
मात्र आता निवडणूक संपली असून, मल्लिकार्जुन यात्रेलाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवून गावातील नेत्यांनी राज्य-परराज्यातील भाविकांसह यात्रा भरवली आहे. हजारो भाविकांचा यात सहभाग आहे. यावेळी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.


Recent Comments