घरातील सदस्य लग्नाला गेल्याची संधी साधून चोरटयांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा १२ लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना बेळगाव तालुक्यातील तारिहाळ येथे घडली आहे.

होय, तारिहाळ गावातील पांडुरंग खणगावकर यांच्या घरी कोण नसल्याची संधी साधून कुलूप तोडून आत प्रवेश मिळवत चोरटयांनी रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा १२ लाखांचा ऐवज लांबविला. पांडुरंग खणगावकर हे घराला कुलूप लावून सुळेभावी येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला गेले होते.
त्याचदिवशी ते परतले तर त्यांचे कुटुंबीय नातेवाईकांकडेच राहिले. गावात परतलेले पांडूरंग घरासमोरच असलेल्या अय्यप्पास्वामी मंदिरात झोपले. हे पाहून चोरटयांनी डाव साधला. चोरटयांनी घरातील ५ टोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आदी सुमारे १२ लाख रुपये किंमतीच्या ऐवजावर डल्ला मारून पोबारा केला. दरवाजा फोडलेला असल्याचे सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी खणगावकर कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर हिरेबागेवाडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


Recent Comments