बेळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मतदान केंद्रांना आमदार सतीश जारकीहोळींनी भेट दिली.

आज बेळगावमध्ये दोन विधान परिषद जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेदरम्यान केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी गुजनाळ ग्रामपंचायतीजवळ मुक्काम केला.
आमदारांना बूथ एजंट नेमण्याची परवानगी नाही. परंतु बूथ जवळ काही आमदारांनी तळ ठोकला असून गोकाक तालुक्यात बेकायदेशीरपणे मतदान प्ररकीय होत असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने आमदार मतदान केंद्रांवर तळ ठोकून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. आपल्याला परवानगी मिळाल्यामुळे राहुल जारकीहोळी यांची एजंट म्हणून नेमणूक केली आहे. तर शिंदीकुरबेट ग्रामपंचायतीसाठी प्रियांका जारकीहोळी यांची एजंट म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, आधी घोषणा केल्यामुळे गुजनाळ येथे आम्ही ७.३० वाजता दाखल झाली. सभासदांचा मतदानाचा हक्क डावलता कामा नये, सदस्यांच्या स्वेच्छेनुसार त्यांना मतदान करण्याची सवलत मिळावी, हा आमचा उद्देश आहे. गेल्या निवडणुकीत एखादा सदस्य उपलब्ध नसताना इतरांनी मतदान केले आहे. अशापद्धतीने ११०० मते बेकायदेशीर रित्या अपक्ष उमेदवारांना गेली असल्याचा आरोपही सतीश जारकीहोळी यांनी केला.
बेकायदेशीर रित्या मतदान होत असल्याच्या कारणावरून आमदार सतीश जारकीहोळी यांनी आज मतदान केंद्रांजवळच तळ ठोकला होता. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Recent Comments