Chikkodi

महांतेश कवटगीमठ यांचे मतदानापूर्वी देवदर्शन !

Share

 तिसऱ्यांदा विधान परिषद निवडणूक लढविणारे भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांनी आज सकाळीसकाळीच देवाचे स्वामीजींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले

विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आज, शुक्रवारी सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. मतदाब करण्यापूर्वी महांतेश कवटगीमठ यांनी आज सकाळी चिक्कोडीतील हुद्दार गल्लीतील रविवार पेठेतील दुर्दुन्देश्वर मठाला भेट देऊन देवाचे आणि स्वामीजींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर हालट्टी येथे जाऊन त्यांनी लक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी चिक्कोडी नगरपंचायतीतील मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. त्यानंतर थेट बेळगाव गाठून त्यांनी मतदान केले.

 

 

 

Tags: