Belagavi

बेळगाव पालिकेतील केंद्रावर कवटगीमठ यांचे मतदान

Share

 बेळगाव जिल्हा विधान परिषद मतदार संघातील भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांनी आज बेळगाव महापालिकेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांनी आज बेळगाव महापालिकेतील १६१ क्रमांकाच्या  मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तरचे आ. अनिल बेनके आणि कुटुंबीय उपस्थित होते.

मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कवटगीमठ म्हणाले, आज राज्यात विधान परिषदेच्या २५ मतदार संघांसाठी मतदान होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक हक्काचा वापर करत मतदान केले आहे. बेळगाव जिल्ह्यात आणि राज्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. देशात पंतप्रधान मोदी आणि राज्यात बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोककल्याणाचे काम करत आहे. त्यामुळे मतदार भाजपला मते देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दोन मुदतीत केलेल्या जनहोताच्या कामांमुळे भाजप विजयी होणार आहे. मतदार, आमदार आणि मंत्र्यांच्या सतत संपर्कात राहिलो आहे. सर्व मंत्री, आमदार, पक्षाचे नेते माझ्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत. पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याने पहिल्या पसंतीचे मत मला देण्याची आणि दुसऱ्या पसंतीचे मत मतदारांनी त्यांच्या इच्छेनुसार देण्याचे आवाहन केले आहे असे कवटगीमठ यांनी सांगितले.

Tags: