शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी येत्या रविवारी बेळगावात भव्य शेतकरी मेळावा आयोजित केल्याची माहिती भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिध्दगौडा मोदगी यांनी दिली.

बेळगावात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना मोदगी म्हणाले, केंद्र सरकारने वादग्रस्त कृषी कायदे नुकतेच मागे घेतले आहेत. त्याप्रमाणे राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात एपीएमसी कायदा, गोहत्या बंदी कायदा, भूसुधारण कायदा मागे घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे कळसा-भांडुरी योजनेचे प्रलंबित काम त्वरित सुरु केले पाहिजे. ऊस उत्पादकांच्या समस्या सरकारने सोडवल्या पाहिजेत या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. त्या हिवाळी अधिवेशनात मांडून त्यावर निर्णय घेतला पाहिजे. यासाठी १२ डिसेंबरला शेतकऱ्यांचे अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे असे मोदगी म्हणाले.
यावेळी रयत संघ, हसीरू सेने आदी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Recent Comments