Chikkodi

कवटगीमठ पहिल्या फेरीतच विजयी होतील : खा. अण्णासाहेब जोल्ले

Share

मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच आमचे उमेदवार महांतेश कवटगीमठ विजयी होतील हे निश्चित असा विश्वास चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले.

खा. अण्णासाहेब जोल्ले यांनी शुक्रवारी सकाळी चिक्कोडी नगरपंचायतीतील बूथ क्र. १९९ वर जाऊन मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र महांतेश कवटगीमठ यांच्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्याशिवाय भाजपचे जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदा, पदाधिकारी आणि नेत्यांनी त्यांच्या विजयासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. राज्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली विकासाची चांगली कामे होत आहेत. ते पाहून स्थानिक स्वराज संस्थांचे सदस्य भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना मतदान करत आहेत. त्यामुळे ते पहिल्या फेरीतच विजयी होतील असा विश्वास खा. अण्णासाहेब जोल्ले यांनीव्यक्त केला.  यावेळी चिक्कोडी नगरपंचायत सदस्य जगदीश कवटगीमठ उपस्थित होते.

 

Tags: