बेळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी बेळगाव महापालिकेत मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आज सकाळी आमदार, खासदारांसोबतच नवनिर्वाचित नगरसेवकांनी तेथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांच्या २ जागांसाठी आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. या निवडणुकीसाठी बेळगाव महापालिकेत मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. १६१ क्रमांकाच्या या मतदान केंद्रावर खासदार, आमदार यांच्यासोबतच बेळगाव महापालिकेच्या नूतन नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. बेळगावच्या खासदार मंगल अंगडी, उत्तरचे आ. अनिल बेनके, दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी मतदान केले. त्याशिवाय नूतन ३५ भाजप नगरसेवकांनीही रांगेत थांबून मतदान केले. 
दरम्यान, मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. अभय पाटील यांनी भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ हे पहिल्या फेरीतच विजयी होतील, आजचे वातावरण पाहता, यापूर्वी दोनवेळा विजयी झालेले कवटगीमठ तिसऱ्यांदाही विजयी होऊन हॅटट्रीक हीरो होतील असा विश्वास व्यक्त केला. बेळगाव, खानापूर मतदारसंघात वातावरण बदलले आहे. केवळ ३५ नगरसेवकच नव्हे तर ५ अपक्षही आमच्यासोबत आहेत. या ४० मतदारांनी आमच्या पक्षाला मतदान केले आहे. दुसऱ्या पसंतीचे मत देण्याबाबत पक्षाच्या आदेशाचे पालन त्यांनी केले आहे असे अभय पाटील यांनी सांगितले.


Recent Comments