२२ मराठा लाईट इन्फन्ट्री, हैदराबादच्या वतीने बेळगावात ५० हिली डे गुरुवारी साजरा करण्यात आला.

माजी सैनिकांच्या सहभागाने बेळगावात गुरुवारी २२ मराठा लाईट इन्फन्ट्री, हैदराबादच्या वतीने बेळगावात ५० हिली डे गुरुवारी साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांनी आणि शाहिद सैनिकांच्या कुटुंबीयांनी मराठा इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये जाऊन तेथील हुतात्मा सैनिक स्मारकाला पुष्पचक्र वाहून हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली. त्यानंतर गोगटे रंगमंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त ब्रिगेडियर मूर्ती, कर्नल हेरवाडकर, कर्नल एस. जी. शिंदे, मेजर मनरोटी आदी उपस्थित होते. ५० व्या हिली डेनिमित्त सैनिक संमेलन घेण्यात आले. या वेळी हिली डे मोहिमेत वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना गौरविण्यात आले. 
या संदर्भात कार्यक्रमाच्या एका आयोजकांनी सांगितले की, १९७१च्या युद्धात हिली डे मोहिमेत शत्रूच्या ९ जवानांना जिवंत पकडण्यात आले होते. या यशाच्या स्मृतीनिमित्त हिली डे साजरा करण्यात येतो.
यावेळी ब्रिगेडियर इबांगन पथकाचे सदस्य आणि सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते.


Recent Comments