मुलांमधील प्रतिभेला वाव देण्यासाठी बेळगावात शालेय विध्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते.

बेळगावातील युनायटेड गोवन्स रिक्रिएशन असोसिएशनच्या वतीने शालेय विध्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत १५ हुन अधिक शाळांमधील विध्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेतला. 
या संदर्भात माहिती देताना युनायटेड गोवन्स रिक्रिएशन असोसिएशनचे सचिव इग्नेशियस मस्कारेन्हस म्हणाले, आम्ही विध्यार्थ्यांमधील सप्त प्रतिभेला वाव देण्यासाठी चेस कॉम्पिटिशनचे आयोजन केले. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. शहर-परिसरातील १५ हुन अधिक शाळांमधील विध्यार्थी-विद्यार्थिनींनी यात भाग घेतला.
यावेळी युनायटेड गोवन्स रिक्रिएशन असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments