पक्ष, भाषा काहीही न विचारता महांतेश कवटगीमठ यांनी खानापूर तालुक्यातील जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास खानापूरचे माजी आ. अरविंद पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील एका खासगी रिसॉर्टमध्ये भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या प्रचारासाठी झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून माजी आ. अरविंद पाटील बोलत होते. ते म्हणाले, सलत २ वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेल्या कवटगीमठ यांनी खानापूर तालुक्याच्या विकासासाठी यथाशक्ती प्रयत्न केले आहेत. एका खऱ्या समाजसेवकाचे हे प्रयत्न वाया जाणार नाहीत. यशस्विनी योजनेंतर्गत त्यांनी अनेक गरीब शेतकरी कुटुंबाना केएलई इस्पितळात मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत.
वीजपुरवठ्यापासून वंचित असलेल्या भीमगड अभयारण्य परिसरातील ५ गावांना वीजजोडणी देण्यात त्यांचे सहकार्य मोलाचे आहे. जनतेने दिलेले सहकार्य स्मरणात ठेवून कृतज्ञता व्यक्त करणारे ते सच्चे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. मतदारांनीही त्यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन अरविंद पाटील यांनी केले. यावेळी शरद कवटगीमठ यांच्यासह भाजप नेते, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments