सराफी दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरलेल्या भामटयांनी २ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील गोलगेरी गावात घडली.

होय, गोलगेरी गावातील लक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या भामटयांनी प्रवेश केला. त्यानंतर हे दागिने नको, ते दाखव असे करून २ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवून पळ काढला. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची ही हातचलाखी चित्रित झाली आहे. कलकेरी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन भामट्यांचा शोध सुरु केला आहे. कलकेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Recent Comments