राज्यातील कोरोनाची परिस्थिती, औषधोपचारांची व्यवस्था आदींबाबत आज संपूर्ण माहिती घेणार आहे. त्यानंतर उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
व्हॉईस ओव्हर : बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी बुधवारी पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले, आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोव्हेंबरमधील कोरोनाच्या परिस्थितीबाबत अनौपचारिक चर्चा करणार आहे. उद्या मंत्रिमंडळ बैठक होणार असून, त्यात पुढील उपायांबाबत गंभीर चर्चा करण्यात येईल. काही जिल्ह्यांत कोरोना आहे तर काही जिल्ह्यांत नाही. त्यामुळे सर्वंकष आढावा घेऊन स्वतंत्र मार्गसूची जारी करण्याबाबत तसेच सर्व सूचनांची दखल घेऊन चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येईल असे बोम्मई म्हणाले.
Recent Comments