उशिराने बस सोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ विजापूर जिल्ह्यातील बुरणापूर येथे विध्यार्थी व पालकांनी निदर्शने केली. यावेळी बस अडवल्यावरून कंडक्टर आणि निदर्शकांत शाब्दिक चकमक झडली.
विजापूर जिल्ह्यातील बुरणापूर येथे गावाला उशिराने बस सोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी बस अडवून निदर्शने केली. पालकांनीही त्यात सहभागी होऊन पाठिंबा दिला. बस अडवल्यावरून कंडक्टर गरम झाला. त्यावेळी कंडक्टर आणि निदर्शक विध्यार्थी-पालकांत शाब्दिक चकमक झाली. बुरणापूर, मदभावी, ड्याबेरी आणि बसवनगर येथील शिक्षणासाठी प्रवास करणारे सुमारे २०० विध्यार्थी असूनही केवळ एक बस, अन तीही विलंबाने सोडण्यात येत असल्याने विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अपुऱ्या बससेवेमुळे विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन लोम्बकळत प्रवास करावा लागत आहे अशी तक्रार निदर्शक विध्यार्थ्यांनी केली.
याआधी २ बस सोडल्या जात. मात्र आता एकच बस सोडली जाते. बसमध्ये चढताना अनेक विध्यार्थी पडून जखमी झाले आहेत अशी तक्रार पालकांनी केली. गेल्या २ वर्षांपासून ही समस्या असून तक्रार करूनही परिवहन मंडळ अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. किमान आता तरी त्वरित ही समस्या सोडवावी अशी मागणी विध्यार्थी आणि पालकांनी केली आहे.


Recent Comments