Belagavi

चन्नम्मा चौकात ट्रॅफिक पोलीस-कंडक्टरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी !

Share

 बेळगावातील चन्नम्मा चौकात बुधवारी सकाळीसकाळी ट्रॅफिक पोलीस अन कंडक्टरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यात पोलिसाने कंडक्टरचे कपाळ फोडले.

होय, जनसेवक मानले गेलेल्या पोलीस आणि कंडक्टर या दोघांनीही संयम पाळणे अपेक्षित असते. परंतु, भर चौकात या दोघांनी फ्री स्टाईल हाणामारी करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे असे झाले की, चालकाने चन्नम्मा चौकात बस थांबविल्यावर तेथे असलेल्या वाहतूक पोलिसाने बस पुढे घेण्यास सांगितले. मात्र यावरून कंडक्टर आणि वाहतूक पोलीसामध्ये आधी शाब्दिक बाचाबाची झाली. मग त्याचे हातघाईत रूपांतर झाले. दोघांनी एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळही केली.

यावेळी वाहतूक पोलिसाने कंडक्टरच्या कपाळावर ठोसे मारून त्याला जखमी केले.  त्यानंतर या दोघांमध्ये भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. नेहमीच वर्दळीने भरलेल्या चन्नम्मा चौक सकाळी-सकाळीच हा प्रकार पाहून लोकांचे मनोरंजन तर झालेच पण, या कृतीवर अनेकांनी खेदही व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

Tags: