Vijayapura

सुनीलगौडा पाटील यांचा विजय निश्चित : राजू अलगूर

Share

कोणीही, कसाही अपप्रचार केला तरी काँग्रेसचे उमेदवार सुनीलगौडा पाटील हे विधान परिषद निवडणुकीत बहुमताने विजयी होतील, असा विश्वास विजापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू अलगूर यांनी व्यक्त केलाय.

विजापूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. अपक्ष उमेदवारांकडून अनेक आरोप करण्यात येत आहेत. परंतु याचा कोणताही परिणाम काँग्रेसचे उमेदवार सुनीलगौडा पाटील यांच्यावर होणार नसून पाटील बंधूंनी केलेली विकासकामेच त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरतील असा विश्वासदेखील राजू अलगूर यांनी व्यक्त केला. अपक्ष उमेदवारांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, हे अत्यंत खोटे असून ते प्राथमिक सदस्यत देखील नसल्याचे राजू अलगूर यांनी स्पष्ट केले.

यानंतर काँग्रेसचे उमेदवार सुनीलगौडा पाटील बोलताना म्हणाले कि, विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी मतदारांनी अभिप्राय दिला होता. यानुसार मी हि निवडणूक लढवीत असून माझ्या विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचे ते म्हणाले. ७ हजार मताधिक्क्याने माझा विजय होईल, असाही विश्वास सुनीलगौडा पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेस नेते संगमेष बबलेश्वर, सुरेश घोणसगी, डॉ. महांतेश बिरादार, गंगाधर संबन्नी, प्रो. युकांची आदी उपस्थित होते.

Tags: