बैलहोंगल तालुक्यातील उडिकेरी गावात नेगीलयोगी रयत सुरक्षा संघाच्या शाखेचा प्रारंभ करण्यात आला.

उडिकेरी गावातील दुर्गादेवी देवस्थानात नेगीलयोगी रयत सुरक्षा संघाच्या शाखेचा उदघाटन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी संघाचे राज्याध्यक्ष धर्मराज गौडर होते. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना शाल घालून संघाच्या नियमावलीची माहिती देण्यात आली.
१३ डिसेंबरला नेगीलयोगी रयत सुरक्षा संघातर्फे विजयोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे संघाचे राज्याध्यक्ष धर्मराज गौडर यांनी यावेळी सांगितले. यावेळी नेगीलयोगी रयत सुरक्षा संघाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments