आपल्या मागण्या मांडण्यास आलेल्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांना भेटण्यास प्रतिबंध केल्याने त्याने डोळ्यात अश्रू आणून संताप व्यक्त केल्याची घटना बेळगाव बाहेरील एका रिसॉर्टमध्ये घडली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बेळगावजवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आले होते. त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी नेगीलयोगी रयत संघटनेचे राज्याध्यक्ष रवी पाटील तेथे आले. बेळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या भात पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याची विनंती ते मुख्यमंत्र्यांना करणार होते. मात्र बंदोबस्तावरील पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे संतापलेल्या रवी पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात डोळ्यात पाणी आणत आक्रोश व्यक्त केला.
भात पिकाच्या अवकाळीने केलेल्या नुकसानीची योग्य भरपाई देण्याची मागणी करण्यासाठी मी आलो आहे, ५० किमी दूरवरून आम्ही आलो आहोत. आमच्यावर अन्याय झाला आहे. आमच्या निवेदनाला किंमत देणार नसतील तर ते कसले मुख्यमंत्री? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. एकंदर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना समजून न घेतल्याने रवी पाटील यांनी त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केल्याचे यावेळी दिसून आले.


Recent Comments