हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात डॉ. बी. आर. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दलित समाजाच्या वसाहतीत ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली.

गावातील दलित नेते आणि युवकांच्या स्वयंस्फूर्तीने जिल्हा अनुसूचित हिंसाचार समितीचे सदस्य सुरेश तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली दलित वसाहतीत ग्रंथालय स्थापन करण्यात आले असून या ग्रंथालयाचे उद्घाटन डॉ. बी. आर. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. या गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या दलित समाजाच्या मान्यवरांच्या आई-वडिलांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना दलित नेते सुरेश तळवार यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, भारताची राज्यघटना तयार करणारे बाबासाहेब हे एक प्रसिद्ध विद्वान होते. तरुणांना सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आज होसूर गावात वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक गावात वाचनालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डी. श्रीकांत, प्रो. नाडकर्णी, रमेश हुंजी, उदय हुक्केरी, लगमप्पा लगाडी, श्रीशैल हरिजन, बसवराज खड्कभावी, कल्लाप्पा गडेण्णावर तसेच दलित नेते, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर हुक्केरी शहरातील आंबेडकर नगर येथील उदय हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी एकत्रित येऊन मेणबत्ती पेटवून महापरिनिर्वाण दिनाचे आचरण केले.


Recent Comments